मॉक ड्रिल म्हणजे काय? ७ मे ला तुमच्या भागात असेल तर हे वाचा !

राज्यभरात ७ मे २०२५ रोजी १६ ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ होणार : प्रशासन सज्ज

मुंबई | ६ मे २०२५

मॉक ड्रिल म्हणजे काय? ७ मे ला तुमच्या भागात असेल तर हे वाचा!

राज्यात ७ मे २०२५ रोजी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा प्रतिसाद आणि यंत्रणेची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील १६ ठिकाणी ही मॉक ड्रिल राबवली जाणार आहे.

या ठिकाणी होणार मॉक ड्रिल

मुंबई, उरण, तायवरे, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छ. संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, शहाड-वायगाव

मॉक ड्रिल म्हणजे काय? ७ मे ला तुमच्या भागात असेल तर हे वाचा!

मॉक ड्रिल म्हणजे काय?
जर एखाद्या शहरात किंवा गावात दहशतवादी हल्ला झाला, तर त्या परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा, पोलिस, नागरिक आणि रेस्क्यू टीम्स कशी प्रतिक्रिया देतील याचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल घेतली जाते. ही एक प्रकारची पूर्वतयारी आहे.

या मॉक ड्रिलमध्ये काय होणार?

  • नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकवले जाईल.
  • ऑफिस, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी डमी हल्ल्यांची स्थिती निर्माण करून प्रत्यक्ष सराव केला जाईल.
  • पोलिस, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, वैद्यकीय कर्मचारी यांचे समन्वय तपासले जातील.
  • सर्वत्र सायरन, पोलिस हालचाली, बॉम्ब डिटेक्शन आणि रिस्पॉन्स टीम्स दिसतील.

नागरिकांनी काय करावे?

  • घाबरून जाऊ नये; ही केवळ एक सराव प्रक्रिया आहे.
  • प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे.
  • अफवांवर विश्वास ठेवू नये.

सतर्क राहा, प्रशासनाला सहकार्य करा.

1 thought on “मॉक ड्रिल म्हणजे काय? ७ मे ला तुमच्या भागात असेल तर हे वाचा !”

  1. मॉक ड्रिल ही एक महत्त्वाची तयारी आहे जी आपत्कालीन परिस्थितींसाठी नागरिक आणि यंत्रणेची तयारी तपासते. ७ मे २०२५ रोजी राज्यातील १६ ठिकाणी ही ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. यामुळे संभाव्य दहशतवादी हल्ल्यांसाठी लोकांची तयारी वाढेल. ही मोहीम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाची आहे. या मॉक ड्रिलचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितींसाठी कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकवणे आहे का?

    Reply

Leave a Comment